‘सी-विजील’ अ‍ॅपवर सेल्फी, तक्रारींचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:38 AM2019-03-19T01:38:48+5:302019-03-19T01:39:15+5:30

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 Self-arrests on the 'C-Visible' app | ‘सी-विजील’ अ‍ॅपवर सेल्फी, तक्रारींचा ओघ

‘सी-विजील’ अ‍ॅपवर सेल्फी, तक्रारींचा ओघ

Next

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचे काटेकोरपालन करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर असली तरी जनतेलाही आचारसंहितेबाबत जागृती निर्माण करून आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे थेट करण्याची मुभा देण्यात आली आहे.
त्यासाठी ‘सी-विजील’अ‍ॅप आयोगाने विकसित केले असून, या अ‍ॅपवर तक्रार नोंदविल्यास संबंधितांमार्फत शंभर तासांत कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्णात आचारसंहिता नऊ दिवसांपूर्वी जारी झाल्याने आजवर या अ‍ॅपवर प्रशासनाला १४ विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यात काही मतदारांनी थेट स्वत:ची सेल्फीच काढून पाठविली आहे. प्रशासनाने तूर्त याकडे दुर्लक्ष केले असले तरी, वारंवार संबंधितांकडून असा प्रकार झाल्यास कारवाई करण्याची तयारी चालविली आहे.
सी-विजील या अ‍ॅपचा यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच वापर होणार आहे. त्यामुळे त्याबाबत निवडणूक यंत्रणेकडून जनजागृती केली जात असून, सदरचे अ‍ॅपवरून कोणताही व्यक्ती आपल्याभोवती होत असलेल्या आचारसंहिता भंगाची तक्रार जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे नोंदवू शकतो. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास ती तक्रार संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवून त्यावर त्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या अ‍ॅपमुळे राजकीय पक्ष, उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे. मतदारांनीदेखील या अ‍ॅपचा वापर सुरू केला असून, त्याद्वारे राजकीय पक्षांचे फलक, बॅनर, पोस्टर्स लावलेली छायाचित्रे अ‍ॅपवर पाठविण्यात आल्याने त्याची दखल घेतली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुमारे चौदा तक्रारी अशाच स्वरूपाच्या आल्या असून, त्यात सर्वाधिक तक्रारी मालेगाव येथील आहे. त्याची तत्काळ गंभीर दखल घेऊन फलक, बॅनर्स काढण्यात आले. तसेच शासकीय रुग्णालयाच्या उद्घाटनाची कोनशिला व त्यावरील राजकीय व्यक्तींचे नावेही कायम असल्याची तक्रार प्राप्त होताच कोनशिला झाकण्यात आली आहे.
आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर होणार असला तरी, काही मतदारांनी या अ‍ॅपवर चक्क स्वत:च्या सेल्फीही पाठविण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक यंत्रणेने प्रारंभी या अ‍ॅपचा वापर करताना त्याची उपयोगीता तपासून पाहण्याचा मतदारांचा भाग असावा, असे समजून दुर्लक्ष केले आहे. परंतु त्यात वाढच होत असल्याचे पाहून त्याची गंभीर दखल घेण्याचे ठरविण्यात आले असून, मुद्दामहून असा प्रयत्न झाल्यास कारवाई करण्यात येईल.
- अरुण आनंदकर
उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title:  Self-arrests on the 'C-Visible' app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.