मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 05:02 PM2019-01-17T17:02:39+5:302019-01-17T17:17:34+5:30
इगतपुरी : शहरात प्रथमच राबविलेल्या मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.
इगतपुरी : शहरात प्रथमच राबविलेल्या मुलींकरीता आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीराला मोठा प्रतिसाद लाभला.
या वेळी प्रशिक्षणासाठी मुख्य प्रशिक्षक दौलत चव्हाण, सह प्रशिक्षक दामिनी वारघडे, दैवता पालवी, अपेक्षा गोतरणे यांनी अचानक किंवा आणिबाणीच्या प्रसंगांत स्वत:चा बचाव कसा करावा यासाठीची विविध तंत्र व प्रात्यक्षिके करून दाखवली. व सहभागी मुलींना प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे अडीचशे विद्यार्थीनींनी या शिबिरात प्रशिक्षण घेतले.या कार्यक्र मास अध्यक्षपदी के. पी. जी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. बी. टी. हॉस्पीटलचे अधिक्षक डॉ. प्रदिप नाईक, प्राचार्य नितीन वामन, नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, अशोक नावंदर, कन्हैयालाल बजाज, रमेशसिंह परदेशी, उपप्राचार्य देविदास गिरी, डॉ. राखी मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
येथील जनसेवा प्रतिष्ठान, पोलीस ठाणे, झेड. आर. नावंदर चॅरिटी ट्रस्ट, नासिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य महाविद्यालय, मन फाऊंडेशन व युवा मार्शल आर्टस अॅण्ड स्पोर्टस कराटे असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक सुजीत रणदिवे यांनी तर सूत्रसंचालन किरण फलटणकर यांनी केले.
कार्यक्र म यशस्वीतेसाठी अजित पारख, प्रकाश नावंदर, महेश मुळीक, विवेक कुलकर्णी, आकाश खारके, योगेश भडांगे, सागर परदेशी, दिनेश लुणावत, हुकूमचंद पाटील, राजेश जैन आदिंनी परिश्रम घेतले.