शिक्षकांच्या संघटनांचे आत्मक्लेश आंदोलन
By admin | Published: October 29, 2015 10:36 PM2015-10-29T22:36:33+5:302015-10-29T22:37:05+5:30
शिक्षकांच्या संघटनांचे आत्मक्लेश आंदोलन
नांदगाव : केवळ पगारपत्रकावर स्वाक्षरी कुणी करायची या मुद्द्यावरून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पगार करता येत नसल्याने या प्रश्नावर प्राथमिक शिक्षक संघ,शिक्षक समतिी, प्राथमिक शिक्षक भारती,शिक्षक सेना व पदवीधर शिक्षक संघटना सह तालुक्यातील शिक्षकांच्या संघटनांनी एकित्रत येवून ३० आॅक्टोबरला पंचायत समिती कार्यालयावर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी संयुक्त पत्रकान्वये कळविला आहे.
दरम्यान, तालुक्यातील शिक्षण विभागाला गेल्या सव्वा दोन वर्षा पासून गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, शिक्षकाधिकारी रहीम मोगल यांचे लक्ष वेधल्यानंतर देखील जिल्हा स्तरावरून कारवाई होत नसल्याने अखेर शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला सध्या तालुक्यात शिक्षणा धीकार्याचे पद रिक्त असल्याने या पदाचा पदभार कुणाही अन्य विस्तार अधिकारी अथवा त्यच्या समकक्ष अधिकार्याकडे सोपविले नसल्याने शिक्षण विभागाला वाली म्हणून कुणीच नाही अशा पाशर््वभूमीवर निर्णय घेणारी यंत्रणाच कार्यरत नसल्याचा परिणाम येथील कामकाजावर होवून ते ठप्प झाले आहे दरम्यान गुरूवारी दुपारी तालुक्याच्या गट विकास अधिकारी चित्रलेखा कोठावळे यांची संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम,शिक्षक भरतीचे जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, पदवीधरचे तालुकाध्यक्ष बाबूलाल ठोंबरे, शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष संजय शेवाळे,आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत आपल्या समस्यांबाबत त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात ललित पगार, किरण डोंगरे, सुनील बोरसे, कांतीलाल जाधव ,गणेश इनामदार,नवनाथ गिते, विठ्ठल बोरसे,विठोबा तुपे आदी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. शिक्षण विभागाला अधिकारीच नसल्याने शिक्षकांनी घेतलेले कर्जाचे हप्ते थकून व्याज व दंडाची आकारणी या चा भुर्दंड सोसावा लागत आहे असे या निवेदनात म्हटले आहे बुधवारी गटविकास अधिकारी श्रीमती कोठावळे यांनी स्वाक्षरी करण्याची तयारी दर्शविली होती़