चांदगिरीत महिलांना स्वावलंबनाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:52 PM2020-09-15T22:52:20+5:302020-09-16T00:57:24+5:30
एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले.
एकलहरे: नाशिक तालुक्यातील चांदगिरी येथील महिलांना स्वावलंबी बनुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उद्योजकता विकास शिबीर घेण्यात आले.या शिबिरात 30 महिलांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले.
ग्रामिण भागातील महिला बचत गट व ग्रुहिणींसाठी चांदगिरी ग्रामपंचायत व महाबँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षणांतर्गत कागदी व कापडी पिशव्या शिवणकाम प्रशिक्षण देण्यात आले. आठवडाभर चाललेल्या या शिबिरात सुमारे 25 ते 30 महिलांनी सहभाग घेतला. यावेळी महिलांना शिवणकामासह कोरोना संसर्गापासून संरक्षण, बँक व्यवहार, उत्पादित मालाचे मार्केटिंग व इतर अनुषंगिक माहिती देण्यात आली. शिबिराच्या समारोप कार्यक्रमात महाबँकेतर्फे सहभागी प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्रे व व्यावसाईक कर्जाचे हमीपत्रही देण्यात आले.अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रशासक सतिष पगार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, नंदु कटाळे, स्वप्निल पाटील, ग्रामसंघाच्या अध्यक्षा प्रियंका कटाळे, प्रशिक्षक राजेंद्र पवार, अजय सिंग, जयम फाऊंडेशनचे भारद्वाज उपस्थित होते.
रुपाली कटाळे, मोहीणी कटाळे, पुनम शेलार, काजल कटाळे, शैला कटाळे, राणी शेलार या महिलांनीही मनोगत व्यक्त केले