स्वेच्छानिवृत्तीनंतर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची नि:स्वार्थ सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:07 PM2020-02-08T23:07:42+5:302020-02-09T00:27:22+5:30
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.
नाशिक : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या नाशिक विभागात कार्यरत ९२० पैकी ७५ टक्के म्हणजे जवळपास ६७४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली असून, हे सर्व कर्मचारी ३१ जानेवारी २०१० पासून कार्यमुक्त झाले आहेत. परंतु, बीएसएनएलच्या सेवा मनुष्यबळाअभावी अचानक कोलमडू नये यासाठी स्वेच्छानिवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी आजही नि:स्वार्थपणे आवश्यक तेनुसार त्यांची जबाबदारी कोणताही मोबदला न घेता सांभाळत आहेत.
बीएसएनएलमधून ७५ टक्के कर्मचाºयांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नाशिकमधील बीएसएनएलच्या ९२० पैकी ६७४ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतरही ते आवश्यकतेनुसार त्यांच्या कामाची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच कोणत्याही मोबदल्याशिवाय सांभाळत आहेत. त्यामुळे बीएसएनएलच्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू
आहेत. बीएसएनएल नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला स्वेच्छानिवृत्ती पत्करणाºया सर्व कर्मचाºयांनी प्र्रतिसाद देत दि. ३१ जानेवारीनंतर कार्यालयीन कामकाजासोबत तांत्रिक व पायाभूत सोयीसुविधांशी निगडित सर्व सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार योगदान देण्याची भूमिका घेतल्याने नाशिकमध्ये बीएसएनएल सेवा सुरळीत सुरू आहेत.
कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ
देशाच्या काही भागांत स्वेच्छानिवृत्तीचा बीएसएनएल सेवेला फटका बसत असला तरी नाशिक त्यास अपवाद ठरले असून, स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाºया कर्मचाºयांनी परिस्थिती आत्मियतेने हाताळल्याने नाशिकमधील सेवा सुरळीत सुरू आहे. यापुढे सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी बीएसएनएलला नाशिकमध्ये शंभर ते दीडशे कर्मचाºयांची गरज भासणार असून, आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने हे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार असल्याचे नितीन महाजन यांनी सांगितले.