दिंडोरी ज्येष्ठ नागरी संस्थेतर्फे चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 10:59 PM2020-03-12T22:59:48+5:302020-03-12T23:03:14+5:30
दिंडोरी : तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित कृषी चर्चासत्राला प्रतिसाद लाभला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आयोजित कृषी चर्चासत्राला प्रतिसाद लाभला.
भारत महासत्ता बनण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासंदर्भात प्रयत्न करणे गरजेचे असले तरी कर्जबाजारीपणा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वयंसिद्ध बनले पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते द. भा. सोनवणे यांनी यावेळी मांडले.
दिंडोरी तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या कृषी कल्याण योजनेंतर्गत आयोजित कृषी चर्चासत्रांतर्गत तालुक्यातील शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ग्रामपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कृषिमालाचे उत्पादन व बाजारपेठा कशा निर्माण कराव्या, कधी कोणते पीक घ्यावे यासंबंधी गावोगावी जाऊन माहिती देण्यात येत आहे.
अध्यक्षस्थानी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतू पाटील मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जयश्री कडाळे, उपसरपंच राजेंद्र उफाडे, ग्रामसेवक विनोद साबळे, संघटनेचे एकनाथ दौंड, त्र्यंबक बस्ते, दगू राजदेव, बाळराजे, संतू पाटील, आय. एम. सय्यद, प्रमोद अपसुंदे, किसन सातपुते, दौलत गायकवाड आदी उपस्थित होते.
चर्चासत्रात शेती व संविधान, शेती व अर्थनीती, शेती व्यवस्थापन व सद्यपरिस्थितीतील समस्या, युवा शेतकरी स्वयंव्यवस्थापन, शेतकरी कर्जमुक्तीसाठी धोरण आदींबाबत संघटनेच्या वतीने माहिती देऊन शासकीय कृषी योजना संबंधित चर्चा करण्यात आली. उपसरपंच राजेंद्र उफाडे यांनीदेखील मार्गदर्शन केले.
यावेळी वरखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खंडेराव उफाडे, जयराम उफाडे, साहेबराव उफाडे, बबन खाडे, भास्कर उफाडे, बाळासाहेब गांगुर्डे, दौलत गडकरी, निवृत्ती कोटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.