राजापूर येथे ई-पीकविषयी चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:31+5:302021-09-07T04:19:31+5:30
मोबाईलमध्ये ई-पीक पाहणीची माहिती कशी भरावी या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सन २०२१-२२ या महसुली वर्षापासून ७/१२ वर ...
मोबाईलमध्ये ई-पीक पाहणीची माहिती कशी भरावी या विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सन २०२१-२२ या महसुली वर्षापासून ७/१२ वर पिकाची नोंदणी फक्त मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतः आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून प्रत्यक्ष आपल्या शेतात जाऊन शेतातील पिकाची माहिती भरावयाची आहे. तलाठी कार्यालयामार्फत आपल्या शेतातील पीक पेऱ्याची माहिती भरली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची माहिती स्वतः भरणे आवश्यक आहेत. एका रजिस्टर मोबाईलमध्ये जास्तीत जास्त २० शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदविता येईल. ई पीक पाहणी ॲपमध्ये पीक नोंदणी ही मर्यादित वेळेतच म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत करायची आहे. या कालावधीनंतर पीक पाहणी नोंद होणार नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.