किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद होणे गरजेचे परिसंवाद : ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ परिसंवादात सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:07 AM2017-11-17T01:07:04+5:302017-11-17T01:07:44+5:30

किशोरवयीन मुला-मुलींसाठी त्यांच्या वयाचा काळ हा त्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात पालक, शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणारी असते

Seminar for interaction with teenage boys and girls: Surrealism in the 'Pediatric Action for Teenage Health' Seminar | किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद होणे गरजेचे परिसंवाद : ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ परिसंवादात सूर

किशोरवयीन मुला-मुलींशी संवाद होणे गरजेचे परिसंवाद : ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ परिसंवादात सूर

Next
ठळक मुद्देदोनदिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन संस्कार मुलांमध्ये रूजला पाहिजेविविध पोस्टर्सच्या माध्यमातून माहिती

नाशिक : किशोरवयीन मुला-मुलींसाठी त्यांच्या वयाचा काळ हा त्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात पालक, शिक्षक आणि वैद्यकीय तज्ज्ञांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणारी असते. त्यामुळे त्यांच्याशी सुसंवादाचा सुवर्णमध्य शोधला पाहिजे, असा सूर परिसंवादात उमटला.
कूर्तकोटी सभागृहात आयोजित ‘पेडियाट्रीशन अ‍ॅक्शन फॉर टीनेज हेल्थ’ या कार्यक्रमांतर्गत दोनदिवसीय प्रदर्शन व चर्चासत्राचे उद्घाटन आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर आणि पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते झाले. सिंगल म्हणाले, रस्ते सुरक्षा ही आपली जबाबदारी सर्वच गोष्टी प्रशासन करेल, अशी अपेक्षा बाळगण्याचे कारण नाही. प्रत्येकाने एक नागरिक म्हणून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजे. हे कर्तव्य पूर्ण करण्याचा संस्कार मुलांमध्ये रूजला पाहिजे, असेही सिंगल म्हणाले.
कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन करण्याकरिता वैद्यकीय शिक्षणातच एक नवा अभ्यासक्र म यावा असे सांगून त्यासाठी आपण तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत पुढाकार घेऊ, असे सांगितले. इंडियन अकॅडमी आॅफ पेडीयाट्रीक्सच्या नाशिक शाखेद्वारा अ‍ॅडोसलन्ट्स हेल्थ अकॅडमीच्या सहाय्याने किशोरवयीन मुला-मुलींकरिता आयोजित कार्यक्र मातील परिसंवादात तज्ज्ञांनी मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. त्यांच्याशी संवादही साधला. इंडियन अकॅडमी आॅफ पेडीयाट्रीक्सद्वारा प्रशिक्षित विविध शाळांमधील विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांना किशोरवयीन समस्या जसे माध्यमांबाबत जागरूकता, अभ्यास कौशल्य, रस्ते सुरक्षा, स्वसंरक्षण, मानसिक व शारीरिक आरोग्य, ड्रग्ज व व्यसनांचे दुष्परिणाम आदी विषयांवर तज्ज्ञांच्या व विविध पोस्टर्सच्या माध्यमातून माहिती देत आहेत. अ‍ॅड. अजित छल्लानी, सोफिया कपाडिया व आस्था कटारिया यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रदर्शन व चर्चासत्रास नाशिकमधील अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली असून, अशा प्रकारचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्र म असल्याचे नाशिक शाखेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बाफना (लोढा) यांनी प्रसंगी सांगितले. सदर प्रदर्शन आजही दि. १७ रोजीही सुरू राहणार असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Seminar for interaction with teenage boys and girls: Surrealism in the 'Pediatric Action for Teenage Health' Seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.