एनआरसी-सीएएवर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:25 PM2019-12-29T23:25:38+5:302019-12-29T23:26:07+5:30
राष्ट्र सेवा दल दिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे एनआरसी- सीएएवर चर्चासत्र घेण्यात आले. या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अशोक फराटे यांचे हस्ते सेवा दल ध्वजारोहण झाले.
मालेगाव : राष्ट्र सेवा दल दिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे एनआरसी- सीएएवर चर्चासत्र घेण्यात आले. या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अशोक फराटे यांचे हस्ते सेवा दल ध्वजारोहण झाले.
संघटक सुधीर साळुंके यांच्यासह सेवा दल सैनिकांनी गीते म्हटली. सेवा दल दिनाचे महत्त्व राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी विशद केले. एनआरसी, एनपीए व सीएए याबद्दल काकाणी वाचनालयाचे अध्यक्ष अजय शहा यांनी मार्गदर्शन केले. एनआरसी व सीएए हे संविधानविरोधी आहे. नागरिकत्व सिद्ध का करायचे आणि त्यानिमित्ताने भ्रष्टाचारच कुरण तयार होईल त्याला कोण जबाबदार? देशातील दलित, आदिवासीकडे कोणतीच कागदपत्रे नाही मग त्यांनी कुठे जायचे, असे प्रश्न शहा यांनी उपस्थित केले. सेवा दल सैनिकांनी प्रश्नोत्तर संवाद केला.
यावेळी सेवा दल सैनिक व टीडीएफचे आर. डी. निकम, सेवा दल तालुका कार्याध्यक्ष विकास मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक फराटे, राजेंद्र भोसले, प्रवीण वाणी, शंकर खैरनार, प्रवीण गायकवाड जयेश शेलार, हरिष पाठक, देवीदास गायकवाड, वेदांत भोकरे, सौरभ शिंदे, वैभव जगताप, साक्षी वाघ, सायली देवरे, कल्याणी आहिरे, शुभम वाघ, प्राची तायडे, महेश बागुल, अवंती वाणी, हिमांशु विसपुते, धनश्री जाधव, दीपिका मंडाळे, काजल धनवटे आदी सेवा दल सैनिक उपस्थित होते. अवंती वाणी हिने शाखा नायक म्हणून काम पाहिले. आभार सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी यांनी मानले.