अंगुलगांव, न्याहारखेडे येथे चर्चासत्र प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 07:48 PM2019-07-13T19:48:58+5:302019-07-13T19:50:36+5:30

अंदरसुल : येवला तालुक्यातील अंगुलगावं व न्याहारखेडे येथील शेतकरी बांधवांना शेतात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी या विषयावरील तालुका कृषी अधिकारी येवला यांच्यामार्फत कृषि सहाय्यक जयश्री जाधव यांनी चर्चासत्र घेतले.

Seminar training at Angulgaon, Nayaharkhade | अंगुलगांव, न्याहारखेडे येथे चर्चासत्र प्रशिक्षण

येवला तालुक्यातील न्याहारखेडे येथे प्रशिक्षण कार्यक्र मात मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण याविषयी माहिती देताना कृषी सहाय्यक जयश्री जाधव.

Next
ठळक मुद्दे शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन पिकाचे निरीक्षण घेण्यात आले,

अंदरसुल : येवला तालुक्यातील अंगुलगावं व न्याहारखेडे येथील शेतकरी बांधवांना शेतात मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळी या विषयावरील तालुका कृषी अधिकारी येवला यांच्यामार्फत कृषि सहाय्यक जयश्री जाधव यांनी चर्चासत्र घेतले.
सदर प्रशिक्षणात सुरु वातीला सर्व शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष मका पिकाच्या प्लॉटवर घेऊन पिकाचे निरीक्षण घेण्यात आले,
या प्रशिक्षणात मंडळ कृषी अधिकारी सिद्दीकी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना व पिक विमा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच कृषी सहाय्यक जयश्री जाधव यांनी मका पिकावर येणाऱ्या लष्करी अळी विषयी सविस्तर माहिती दिली. तर कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब पाटोळे यांनी हुमणी किड नियंत्रण विषयी मार्गदर्शन केले. संजय मोरे यांनी प्रस्ताविक तर सोपान जगझाप यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्र मासाठी शेतकरी संघटनेचे श्रावण देवरे, अरु ण जाधव, परमानंद जाधव, कृष्णा जानराव, मुलतानी, सुभाष देवरे, उज्वला जगझाप आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Web Title: Seminar training at Angulgaon, Nayaharkhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी