बागलाण पंचायत समितीत सेना-भाजप युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:49+5:302021-02-24T04:15:49+5:30

पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (दि. २२) रोजी सकाळी ११ वाजता बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांचे अध्यक्षतेखाली उपसभापती ...

Sena-BJP alliance in Baglan Panchayat Samiti | बागलाण पंचायत समितीत सेना-भाजप युती

बागलाण पंचायत समितीत सेना-भाजप युती

Next

पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी (दि. २२) रोजी सकाळी ११ वाजता बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांचे अध्यक्षतेखाली उपसभापती पदाची निवड करण्यात आली. गत महिन्यात शिवसेनेचे उपसभापती कान्हू अहिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्या रिक्त जागेवर पंचायत समिती उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत उपसभापती पदासाठी ठेंगोडा गणातील भाजपा सदस्या ज्योती अहिरे यांचा एकमेव नामांकन अर्ज सादर करण्यात आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती ज्योती अहिरे यांना सूचक म्हणून भाजपचे पं.स.सदस्य अशोक अहिरे होते.

नवनिर्वाचित उपसभापती ज्योती अहिरे यांचा सत्कार तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, माजी जि.प.सदस्य पप्पू बच्छाव यांचे हस्ते करण्यात आला.

बैठकीस सभापती इंदूबाई ठुमसे, सदस्य पंडित अहिरे, रामदास सूर्यवंशी, वैशाली महाजन, विमल सोनवणे, लताबाई सोनवणे, शीतल कोर, कल्पना सावंत, अतुल अहिरे, अशोक अहिरे, यांचेसह भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय देवरे आदी उपस्थित होते. निवडणुकीचे कामकाज सागर रोकडे, प्रशासन अधिकारी बाळा बच्छाव, पी.एस.नेरकर, योगेश बत्तीसे, वैजनाथ फटागंडे, जयंत दुसाने यांनी बघितले. निवड घोषित होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

इन्फो

आघाडीचा मुखभंग

बागलाण पंचायत समिती एकूण चौदा सदस्य आहेत. त्यामध्ये भाजप ७ ,सेना १ ,राष्ट्रवादी ३ ,काँग्रेस २ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे कान्हू अहिरे यांच्या नावाला भाजपाच्या काही सदस्यांनी विरोध केल्याने ऐनवेळी अहिरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून उपसभापती पद पदरात पाडून घेतले होते . गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अहिरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपसभापती पद राखण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र ऐनवेळी भाजपचे आमदार दिलीप बोरसे आणि शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव यांनी सेना व भाजप यांना एकत्र आणत युतीवर शिक्कामोर्तब केले . दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी उपसभापती पदासाठी ठेंगोडा गणाच्या भाजपा सदस्या ज्योती अहिरे यांच्या नावावर एकमत केले.

फोटो- २३ बागलाण पंचायत समिती

बागलाण पंचायत उपसभापतीपदी भाजपाच्या ज्योती अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव ,दिलीप अहिरे आदी .

===Photopath===

230221\23nsk_33_23022021_13.jpg

===Caption===

 फोटो- २३ बागलाण पंचायत समिती बागलाण पंचायत उपसभापतीपदी भाजपाच्या ज्योती अहिरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे स्वागत करतांना शिवसेनेचे माजी जिल्हापरिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव ,दिलीप अहिरे आदि .

Web Title: Sena-BJP alliance in Baglan Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.