स्थायी समितीच्या बैठकीत सेना नगरसेविकांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:38+5:302021-02-27T04:18:38+5:30

स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि.२६) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी हे आंदोलन केले. गोविंदनगर ...

Sena corporators sit in the standing committee meeting | स्थायी समितीच्या बैठकीत सेना नगरसेविकांचा ठिय्या

स्थायी समितीच्या बैठकीत सेना नगरसेविकांचा ठिय्या

Next

स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि.२६) सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी त्यांनी हे आंदोलन केले. गोविंदनगर येथील नदीपात्रातील अतिक्रमणांबाबत कल्पना पांडे यांनी दोन ते तीन वेळा तक्रार केली होती; परंतु त्यानंतर अतिक्रमणे हटवली जात नाही त्यामुळे किमान नदीपात्रालगत संरक्षक भिंत आणि पूल बांधण्याची मागणी केली होती. मात्र, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद नसल्याचे आढळल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (दि.२६) यासंदर्भात नगररचना आणि बांधकाम खात्याला जाब विचारला. सभापती गिते यांनी आश्वासन देऊनदेखील त्यांनी आंदोलन कायम ठेवले. त्यानंतर सभेचे कामकाज संपले, मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली.

इन्फो...

प्रशासनाने वर्क ऑर्डर रोखल्या

स्थायी समितीने विविध कामांना प्रशासनाच्या प्रस्तावानंतर मंजुरी दिल्यानंतरदेखील प्रशासनाने आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची कार्यारंभ आदेश थांबवल्याने शिवसेनेने ज्येष्ठ सदस्य सुधाकर बडगुजर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थायी समितीवर प्रस्ताव पाठवताच कशाला, असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी प्रकरणीदेखील चुकीच्या पद्धतीने शासनाकडे ठराव विखंडित करण्यात आल्याने त्याबाबतही बडगुजर यांनी प्रश्न उपस्थित केले.

===Photopath===

260221\26nsk_73_26022021_13.jpg

===Caption===

मनपाच्या स्थायी समिती बैठकीत आंदोलन करताना कल्पना पांडे व सुनीता कोठूळे

Web Title: Sena corporators sit in the standing committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.