सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 10:57 PM2018-07-19T22:57:02+5:302018-07-20T00:17:27+5:30

Sena threatens corporator of former minister's wife | सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी

सेनेच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची नगरसेविकेला धमकी

Next
ठळक मुद्दे गुन्हा दाखल

नाशिकरोड : विहितगाव नाका चौफुलीवर प्रभागातील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे कामकाज पहात असताना नगरसेविका सरोज अहिरे यांना माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रभाग २२ च्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली आहे. विहितगाव नाका चौफुलीवर बुधवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास रस्त्यावर पडलेले खड्डे मनपा कर्मचारी बुजवत होते. त्या ठिकाणी अहिरे या कामांची पाहणी करत होत्या. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अहिरे यांनी नयना घोलप यांचा पराभव केला होता. तो राग मनात धरून माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या पत्नी शशिकला घोलप या गाडीतून जात असताना त्या ठिकाणी थांबून येथे काय तमाशा करतात, असे म्हणून शिवीगाळ करत गाडीतून उतरले तर तुला मारहाण करेल, अशी धमकी दिली, असे अहिरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात शशिकला घोलप यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Sena threatens corporator of former minister's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा