मुंगसऱ्यात राष्ट्रवादीला मात देत सेनेचा भगवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:13 AM2021-02-14T04:13:54+5:302021-02-14T04:13:54+5:30
मुंगसरा ग्रामपंचायतीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल काळे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे विष्णुपंत म्हैसधुणे यांनी पुढाकार ...
मुंगसरा ग्रामपंचायतीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहुल काळे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे विष्णुपंत म्हैसधुणे यांनी पुढाकार घेत आपली सूनही व काही सदस्य बिनविरोध निवडून आणले होते. तर शिवसेनेचे राजाराम पा. फडोळ यांनी एक जागा बिनविरोध निवडून आणली होती. निवडणुकीत सरपंचपदासाठी रामदास उगले व भाऊसाहेब म्हैसधुणे यांनी तर उपसरपंच पदासाठी शीतल भोर व रोहिणी फडोळ यांनी अर्ज दाखल केले पैकी भाऊसाहेब म्हैसधुणे यांना ५ मते मिळवून विजयी तर रामदास उगले यांना ४ मते मिळून पराभूत व्हावे लागले. उपसरपंचपदासाठी शीतल भोर यांनी ५ मते मिळवून विजय संपादन केला. तर रोहिणी फडोळ यांना ४ मते मिळाल्याने पराभवास सामोरे जावे लागले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वर्षा म्हैसधुणे, शीतल भोर, रोहिणी फडोळ, अनिता घोरपडे, सरला घोरपडे, रामदास उगले, आकाश कडाळी, भाऊसाहेब म्हैसधुणे, भाऊसाहेब बदादे उपस्थित होते. निवडणुकीचा निकाल लागताच यावेळी जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली व फटाके फोडून आतषबाजी करण्यात आली. (फोटो १३ मुंगसरा)