ग्रामीण भागात सेनेचे शिवसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:11 AM2021-07-23T04:11:08+5:302021-07-23T04:11:08+5:30
नाशिक : वालदेवीचे सौंदर्य लयास गेले असून, प्रदूषणामुळे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. सामाजिक संस्था तसेच महापालिकेकडून नंदिनी ...
नाशिक : वालदेवीचे सौंदर्य लयास गेले असून, प्रदूषणामुळे नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. सामाजिक संस्था तसेच महापालिकेकडून नंदिनी नदी बचावासाठी मोहीम राबविली जात असताना वालदेवी नदी बचावासाठीदेखील मोहीम राबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वालदेवी नदीपात्रावर फेस पसरला आहे.
लसीकरण केंद्रांवर रोजच विचारणा
नाशिक : शहरातील लसीकरण केंद्रांवर पुरेसा लसीकरणाचा साठा नसला तरी दररोज केंद्रांवर लसीबाबतची विचारणा करण्यासाठी गर्दी होत आहे. केंद्राबाहेर फलक लावला जात असून, काही ठिकाणी केंद्राचे प्रवेशद्वारही बंद केले जात आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या ज्येष्ठांबरोबरच वादाचेदेखील प्रसंग उद्भवत आहेत.
अवैध वाळू कारवाईचा वचक
नाशिक : नगर येथील गौण खनिज पथकाने नाशिकमध्ये येऊन केलेल्या कारवाईने जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाची माहिती नगरच्या पथकाला मिळाल्यामुळे त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्यातील अवैध उत्खनन थांबले असल्याचेही दिसते.
भूमिहीन शेतमजुरांना खावटी वाटप
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी शेतमजुरांना देण्यात येणाऱ्या खावटी वाटपाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूमिहीन शेतमजुरांना खावटी वाटप सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत लाभार्थींना रेाख रक्कम देण्यात आली. काही तालुक्यांमध्ये अद्याप खावटी वाटप झालेले नाही.
बाळांची लसीकरण मोहीम सुरू
नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे लहान बाळांना देण्यात येणारी पीव्हीसी, गोवर तसेच मेंदुज्वर लसीकरण थांबविण्यात आले होते. आता या मोहिमेला सुरुवात झाली असून, ग्रामीण भागात तसेच शहरी आरोग्य केंद्रातही बाळांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी जनजागृतीदेखील केली जात आहे.