सेनेत उत्साह, भाजपात निरुत्साह
By Admin | Published: December 6, 2014 01:05 AM2014-12-06T01:05:36+5:302014-12-06T01:12:00+5:30
जिल्'ाला मंत्रिपद : पालकमंत्रिपदाची अपेक्षा
नाशिक : दीड महिन्यापासून मंत्रिपदाविना पोरक्या राहिलेल्या नाशिक जिल्'ाला अखेर राज्यमंत्रिपद का असेना मंत्रिपद मिळाले असून, सेनेचे दादा भुसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर सेनेच्या गोटात उत्साह असला तरी, राज्यात सर्वाधिक जागा मिळवून सत्तेवर आलेल्या भाजपाच्या स्थानिक आमदारांची वर्णी न लागल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळात नाशिक जिल्'ाने प्रतिनिधित्व केले असून, अनेक खात्यांचे मंत्रिपद भूषविले आहे. राज्यात पहिल्यांदा १९९५ मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळात तर जिल्'ाला चार मंत्री लाभले होते. त्यानंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या रूपाने उपमुख्यमंत्रिपद व सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदही जवळपास पंधरा वर्षे जिल्'ाला मिळाले; परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून भारतीय जनता पार्टीचे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्'ाला एकही मंत्रिपद पहिल्या विस्तारात मिळाले नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा जवळपास दीड महिना मंत्रिपदाविना असताना, सेना-भाजपाची युती नाशिक जिल्'ाला फलदायी ठरली. तीन वेळा विधिमंडळाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादा भुसे यांना सेनेच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद देण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण असून, भुसे समर्थकांनी जोरदार जल्लोष केला, तर दुसरीकडे नाशिक शहरातून तीन आमदार भाजपाचे देऊनही एकाही आमदाराला मंत्रिपद न मिळाल्याने भाजपा गोटात निरुत्साह पसरला आहे. विशेष करून, देवयानी फरांदे व सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा होत होती.