पाहणीसाठी केंद्रीय पथक पाठवा : भामरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:51 PM2020-04-23T22:51:26+5:302020-04-24T00:12:20+5:30
मालेगाव : शहरात कोरोनाचा (कोविड १९) उद्रेक झाला आहे. आज मालेगावमध्ये १०३ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली असून, शहरातील स्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला जसे केंद्रीय पथक (सेंट्रल टीम) पाठवले तसे मालेगावातही पाठवून परिस्थितीची पाहणी करावी. त्यासोबतच पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवान मालेगावात नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे.
मालेगाव : शहरात कोरोनाचा (कोविड १९) उद्रेक झाला आहे. आज मालेगावमध्ये १०३ कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली असून, शहरातील स्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबईला जसे केंद्रीय पथक (सेंट्रल टीम) पाठवले तसे मालेगावातही पाठवून परिस्थितीची पाहणी करावी. त्यासोबतच पोलीस आणि आरोग्य यंत्रणेवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी सीआरपीएफचे जवान मालेगावात नियुक्त करण्यात यावेत अशी मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली आहे. मालेगाव शहर कोरोनाचे (कोविड १९) हॉटस्पॉट बनले आहे. शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आज १०३ वर पोहोचली आहे, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. खरे तर ती त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. कारण टेस्टची संख्या कमी आहे मालेगाव महापालिका प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे. त्यातही मालेगावमधील जनता सहकार्य करीत नसल्याने स्थिती या थराला पोहोचली आहे. तीन दिवसांपूर्वी मालेगावी रुग्णालयात करण्यात आलेली तोडफोड, डॉक्टरांवर झालेला हल्ला गुरुवारी सकाळी पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला हे सर्व प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे स्पष्टपणे दाखवून देते. त्यामुळे तेथील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन केंद्र सरकारने मालेगावमध्ये केंद्रीय पथक (सेंट्रल टीम) त्वरित पाठवून मालेगाव शहराची तपासणी करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.