कोरोना रुग्णांना थेट रुग्णालयात पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:15 AM2021-07-31T04:15:41+5:302021-07-31T04:15:41+5:30
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक ...
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ यांनी खत वाटपाचाही आढावा घेतला. खतांच्या वाटपाबाबत शेतकऱ्यांना दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच खतांचा साठा मुबलक प्रमाणात असून, शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावा, अशाही सूचना त्यांनी केल्या. दरम्यान, येवला तालुक्यात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदतीचे वाटप धनादेशाद्वारे करण्यात आले. कोरोनामुळे निधन झालेल्या व्यक्तींचे अंत्यविधी व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणाऱ्या निफाड तालुक्यातील युवकांचा सन्मान करण्यात आला. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, पंचायत समितीचे सदस्य मोहन शेलार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा कुप्पास्वामी, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, कृषिविकास अधिकारी रमेश शिंदे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, आदी उपस्थित होते.