गृहविलगीकरणातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:24+5:302021-05-31T04:12:24+5:30
येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती व उपाय योजनांसह विकासकामांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. ...
येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्य:स्थिती व उपाय योजनांसह विकासकामांचा आढावा भुजबळ यांनी घेतला. शहरातील कोरोना रुग्णांचे गृहविलगीकरण करू नये. ज्या रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे, त्यांना त्वरित शासकीय रुग्णालयात स्थलांतरित करून उपचार सुरू करण्यात यावे. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही यावेळी भुजबळ यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या.
कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने बाजारात होणारी गर्दी टाळावी व सामाजिक अंतराचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे यासाठी शहरात स्वच्छता ठेवावी व पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही निर्देश नगरपालिका अधिकार्यांना देण्यात आले.
इन्फो
नुकसानीचे पंचनामे करा
तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, शेतकर्यांना खरीप पीक कर्ज वाटप वेळेत करावे. येवला शहरातील नियोजित शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला असून, त्याबाबत निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना यावेळी देण्यात आल्या.