दोन वेगवेगळ्या अपघातात बालकासह ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:14 AM2021-03-06T04:14:12+5:302021-03-06T04:14:12+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि . ३) रोजी सायंकाळी ६ वाजता अशोक अहिरे (७०) व तीन पत्नी लता ...

Senior citizen dies with child in two separate accidents | दोन वेगवेगळ्या अपघातात बालकासह ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या अपघातात बालकासह ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार (दि . ३) रोजी सायंकाळी ६ वाजता अशोक अहिरे (७०) व तीन पत्नी लता आहिरे (६५) दोघेही कर्माहाईट पासून गुरुगोविंदसिंग महाविद्यालयापर्यंत फेरफटका मारण्यासाठी जात असताना पाठीमागून जोरात आलेल्या एमच ०६ एझेड ६१४४ चारचाकीने दोघांनाही धडक दिली. या अपघातात अशोक आहिरे यांना छाती, पोट, कंबरेला व मांडीला गंभीर दुखापत झाली. त्यांची पत्नी लता आहिरे यांनाही दुखापत झाल्याने दोघांनाही एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवार (दि४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास अशोक आहिरे यांची प्राणज्योत मालवली. दुसरी घटना फाळके स्मारकासमोर घडली. मागून भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बालकाचा मृत्यू झाला. विल्होळी येथील पंढरीनाथ दत्तू खाडगीर हे दुचाकी (एमएच १५, ईएम ३६७२) वरून त्यांची पत्नी आणि मुलगा किरण यांना घेऊन पाथर्डी कडून विल्होळी कडे जात होते. यावेळी फाळके स्मारकासमोर समांतर रस्त्यावरून जात असताना गतिरोधक असल्याने दुचाकीचा वेग कमी केला असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पती पत्नी व मुलगा दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले यामध्ये पती व पत्नी जखमी झाले आहे.तर मुलगा किरण (१०) याला डोक्याला, खांद्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही अपघातांमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताची चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Senior citizen dies with child in two separate accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.