ज्येष्ठ नागरिकाला लस घेऊन तर मुलाला लसीविनाच स्टीलच्या वस्तू चिकटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:05 PM2021-06-11T17:05:48+5:302021-06-11T17:06:15+5:30
सिडको : जुने सिडको येथील ज्येष्ठ नागरिकाच्या शरीरावर स्टीलच्या, लोखंडी वस्तू चिकटत असल्याचा प्रकार उघडकीस येत नाही, तोच अंबड येथील महालक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या नानासाहेब देवरे (६१) व त्यांचा मुलगा हिनेश देवरे (११) यांच्यादेखील शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे दिसून आले.

नानासाहेब देवरे यांनी दोन महिन्यांपूर्वी कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर त्यांचा मुलगा हिनेश याने मात्र कुठल्याही लसीचा डोस घेतला नसतानाही त्याच्या अंगावरदेखील स्टीलचे चमचे, कॉइन तसेच लोखंडी वस्तू चिकटत असल्याचे आढळून आले. त्यामुळे ज्या व्यक्तींनी लस घेतलेली नाही अशा व्यक्तींच्या शरीरावरही स्टीलचे चमचे, कॉइन तसेच लोखंडी वस्तू चिकटत असल्याने लस घेतल्यामुळे हा प्रकार होत असल्याचा दावा फोल ठरला असल्याचे बोलले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी जुने सिडको येथे अरविंद सोनार या ज्येष्ठ नागरिकाबाबत घडलेल्या प्रकारानंतर मनपाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता लसीमुळे असा प्रकार होत नसल्याचे सांगितले होते. त्या घटनेनंतर शुक्रवारी अंबडच्या देवरे यांनी त्यांच्या घरी तपासणी केली असता त्यांच्याबरोबरच त्यांचा मुलगा हिनेश याच्या शरीरावरदेखील स्टीलचे चमचे, उचटणी तसेच कॉइन चिकटत असल्याचे दिसून आले.