एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:51 PM2019-04-18T23:51:56+5:302019-04-19T00:16:33+5:30
शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.
एकलहरा : शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात, तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सतत्येबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि फोटोतील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात.
एस.टी. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे अनेकदा वाहकाकडून सांगितले जाते. एवढेच नाही तर बसस्थानकात विनावाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही असाच अनुभव येतो.
विधानसभेत यासंदर्भात उपस्थित लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात त्यांनी यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केल्याचे सांगितले होते. यामध्ये ज्येष्ठांसाठी सवलतींच्या अनेक विभागांबरोबरच एस.टी. विभागाचाही समावेश आहे, असे असतानाही एस.टी.ने प्रवास करताना ६० ते ६५च्या मधील वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांची अजूनही कुचंबणा होते. ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे (जी शासनाने निर्गमित केलेली आहेत.) ती दाखविल्यानंतर त्यांना ६५ वर्षे पूर्ण असल्याशिवाय ५० टक्के सवलतीचे तिकीट दिले जात नाही. याबाबत नेमके काय धोरण आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे केल्याचा आदेश अद्याप एस.टी. महामंडळाकडे आला नाही काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
गोंधळाची परिस्थिती कायम४ ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, त्
ाणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती.