ज्येष्ठ नागरिकदिनी रंगली चला हसूया काव्यमैफील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:19 AM2021-08-24T04:19:05+5:302021-08-24T04:19:05+5:30
निमित्त होते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे. पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना'निमित्त कवी किरण ...
निमित्त होते जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे. पळसे ग्रामविकास मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना'निमित्त कवी किरण भावसार, प्रा. राजेश्वर शेळके, रवींद्र मालुंजकर यांच्या 'चला हसूया' या काव्यमैफिलीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच बबनराव थेटे, पोलीस पाटील सुनील गायधनी मंचावर होते.
नर्मविनोदी कवितांसह बालकविता सादर करून किरण भावसार यांनी मैफिलीत रंग भरला, तर प्रा. राजेश्वर शेळके आणि कवी रवींद्र मालुंजकर यांनीही वात्रटिका, विडंबन, किस्से, काव्य यांसह विविध हास्यकविता सादर करून ज्येष्ठ नागरिकांना लोटपोट हसविले. कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या ज्येष्ठ नागरिक आणि रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. प्रास्ताविक पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांनी केले. उपाध्यक्ष अशोकराव गायधनी, सेक्रेटरी राजाराम गायधनी, सहसेक्रेटरी शिवाजीराव गायखे यांनी स्वागत केले. याप्रसंगी नामदेव गायधनी, रामदास गायधनी, शिवराम गायधनी, वसंत डेरिंगे, आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका आशा गाडे, संजय सर, मधुकर सर, मोतीलाल चव्हाण, विद्या काकळीज, एस. ए. जाधव, भाऊराव जाधव, समाधान गायके, अविनाश पगार, ज्ञानेश्वर गायधनी, ग्रंथपाल शालिनी घोडे, निर्मला गायधनी, आदी उपस्थित होते. निवृत्ती देवकर यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रिया गायधनी यांनी मानले. (फोटो २३ पळसे)