ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी  मोफत वाहनांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:32 AM2019-05-28T00:32:01+5:302019-05-28T00:32:41+5:30

शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 Senior Citizens, Free Vehicle Arrangements for Patients | ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी  मोफत वाहनांची व्यवस्था

ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी  मोफत वाहनांची व्यवस्था

Next

नाशिकरोड : शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच देवदर्शन, सुख-दु:खाप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना बाहेरगावी जायचे असेल तर मारुती व्हॅनमध्ये पेट्रोल भरून मोफत वाहन घेऊन जाऊ शकतात.
धोंगडेनगर येथील शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने सतीश बिºहाडे व पवन उगले यांच्या स्मरणार्थ रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी मारुती व्हॅन लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी प्रा. यशवंत पाटील, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक रमेश धोंगडे, ज्योती खोले, संगीता गायकवाड, दिनकर पाळदे, शिरीष लवटे, बंटी कोरडे, रमेश जाधव, डॉ. विशाल कासलीवाल आदी उपस्थितीत होते.
प्रास्ताविकात आयोजक अतुल धोंगडे यांनी मारुती व्हॅनसाठी शिवा धोंगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल धोंगडे यांनी केले. यावेळी आकाश उगले, शशी चौधरी, नितीन धानापुणे, सतीश बिरारे, बाळासाहेब जाधव, सूर्यभान गायधनी, मोहन धोंगडे, मच्छिंद्र चव्हाण, नितीन धोंगडे, अमोल धोंगडे, अतुल चव्हाण, गौरव बागुल आदी उपस्थित होते.

Web Title:  Senior Citizens, Free Vehicle Arrangements for Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.