दिंडोरीत ज्येष्ठ नागरिक संघाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:30 PM2020-02-07T13:30:54+5:302020-02-07T13:31:02+5:30

दिंडोरी : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पालखेड रस्त्याच्या दुरावस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती मुरूमाच्या मुलाम्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे सर्वांनाच श्वसनाला त्रास होत आहे मात्र याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्क वाटत गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले असून आता तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का असा सवाल उपस्थित करत आहे.

 Senior Citizens' Movement in Dindori | दिंडोरीत ज्येष्ठ नागरिक संघाचे आंदोलन

दिंडोरीत ज्येष्ठ नागरिक संघाचे आंदोलन

Next

दिंडोरी : शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पालखेड रस्त्याच्या दुरावस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती मुरूमाच्या मुलाम्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. यामुळे सर्वांनाच श्वसनाला त्रास होत आहे मात्र याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे.याकडे लक्ष वेधण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक संघाने मास्क वाटत गांधीगिरी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले असून आता तरी प्रशासन जागे होऊन रस्त्याचे नूतनीकरण करणार का असा सवाल उपस्थित करत आहे.
पालखेड रोडची अवस्था अतिशय बिकट झाली असून मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सदर रस्ता हा अतिशय रहदारीचा असून एमआयडीसीच्या अवजड वाहनांमुळे सतत खराब होत असता. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग व दिंडोरी नगरपंचायत यांच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून हा रस्ता डांबरीकरण झालेला नाही. त्यामुळे प्रचंड धूळ उडते, याचा त्रास मोठ्याप्रमाणात दुकानदार व दुचाकी चालक व पायी चालणारे विद्यार्थी व दिंडोरीकर नागरिक यांना भोगावा लागत असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळीपासून संरक्षण होण्यासाठी पालखेडरोड वरील व्यापाऱ्यांना ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी मास्क वाटप करून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करून संबंधित प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घातले आहे.
दिंडोरी तालुका जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने तहसीलदार कैलास पवार यांना संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष एकनाथ दौंड यांच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संतु मोरे, त्र्यंबक बस्ते, सचिव शांताराम पाटील, प्रमोद पाटील, किसन सातपुते, शंकरराव राजदेव, बाळ राजे, इलियास सय्यद, अण्णासाहेब कदम, गोपीनाथ घुमरे, दगू सोनवणे, भिका कावळे, दौलतराव दगू बोरस्ते, संपतराव मुरकुटे, अँड. फराद पठाण, भास्कर वडजे, यमुनाबाई पाटील, गिताबाई पाटील, राजाराम पाताडे, मुरलीधर क्षीरसागर, रामराव क्षीरसागर, भिका ढाकणे, रामकृष्ण वडजे, सुरेश वाघ, पुंडलिक ढगे, शशिकांत वाघ, माणकि भालेराव आदी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते रणजित देशमुख यांनी आंदोलनाला पाठींबा देत सहभाग घेतला.

Web Title:  Senior Citizens' Movement in Dindori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक