ज्येष्ठ नागरिकांचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 10:25 PM2017-08-04T22:25:54+5:302017-08-05T00:22:29+5:30
शेतकरी, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी, नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संस्थांना शासकीय अनुदान द्यावे यासह इतर तीन मागण्यांसाठी तालुक्यातील सौंदाणे येथील हर हर महादेव ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते.
मालेगाव : शेतकरी, शेतमजूर, ज्येष्ठ नागरिकांना पाच हजार रुपये दरमहा पेन्शन द्यावी, नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिक संस्थांना शासकीय अनुदान द्यावे यासह इतर तीन मागण्यांसाठी तालुक्यातील सौंदाणे येथील हर हर महादेव ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष सुकदेव देवरे, उपाध्यक्ष पोपट पवार, सचिव झुंबरलाल पवार, सहसचिव देवा पवार, खजिनदार राजाराम पवार, लक्ष्मण पवार, बी. के. नागपुरे, अशोक वारूळे, शंकर जगताप, बाबुलाल खैरनार, दयाराम पवार, गमन पवार, हेमचंद्र अहिरे, काशीनाथ पवार आदि सहभागी झाले होते.