लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 12:04 AM2021-03-19T00:04:53+5:302021-03-19T01:28:43+5:30
सिस्को : कोरोना महामारीचा प्रसार झपाट्याने वाढत असून, यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठांना मोफत लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे; परंतु या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या उपकेंद्रावर सोयीऐवजी गैरसोयच अधिक असल्याने, ज्येष्ठांना उन्हाच्या दिवसांत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र सिडको भागातील उपकेंद्रावर दिसून येत आहे.

महानगरपालिकेच्या जुने सिडको आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ह्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, आपला क्रमांक येण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना उन्हात उभे राहिल्यामुळे भोवळ येणे, रक्तदाब वाढणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारी होत आहेत.
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे यांच्याकडे तक्रार आल्यावर त्यांनी ह्या केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी शेड लावण्यास महापालिकेच्या सिडको विभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेत तातडीने शेड उभारून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला.