ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:12 AM2018-09-17T01:12:38+5:302018-09-17T01:13:10+5:30

तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल्ला वनाधिपती विनायकदादा पाटील दिला.

Senior citizens should fulfill the role of guide: Patil | ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी : पाटील

ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी : पाटील

Next

निफाड : तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल्ला वनाधिपती विनायकदादा पाटील दिला.
निफाड येथे निफाड शहर ज्येष्ठ नागरीक संघाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी त्रबंकरावं गुंजाळ होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार दिलीप बनकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राज्यअध्यक्ष उत्तम तांबे , निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे , उपनगराध्यक्ष स्वाती गाजरे , नगरसेवक राजाभाऊ शेलार ,निफाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कुंदे , वि. दा .व्यवहारे, शशांक सोनी, राजेंद्र राठी ,शिवाजी ढेपले , ह. भ. प पंडित महाराज कोल्हे , निफाड वि का सोसायटीच्या उपाध्यक्ष भारती कापसे, ब्रिजलाल भुतडा आदी मान्यवर होते. प्रारंभी प्रास्तविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव डॉ सोमनाथ आंधळे यांनी केले याप्रसंगी दिलीप बनकर, उत्तम तांबे , पंडीत महाराज कोल्हे, त्र्यंबकराव गुंजाळ , शिवाजी ढेपले , अनिल कुंदे यांची भाषणे झाली. याप्रसंगी निफाड पोलिस ठाण्याच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांचा वाढदीवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष सुधाकर कापसे, उपाध्यक्ष उत्तम गाजरे, खजिनदार साहेबराव कापसे, लासलगाव कृउबाचे संचालक सुभाष कराड, दत्ता उगावकर , विजय बोरा , तुकाराम उगले आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. आभार संपत व्यवहारे यांनी मानले.

Web Title: Senior citizens should fulfill the role of guide: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक