माकपचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:47+5:302021-04-04T04:15:47+5:30

वयाने ज्येष्ठ असूनही तरुणांपेक्षा अधिक चपळतेने काम करणाऱ्या कॉ. देशपांडे यांनी कॉ. नाना मालुसरे यांच्या प्रेरणेने माकपचे काम सुरू ...

Senior CPI (M) leader Shridhar Deshpande passes away | माकपचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन

माकपचे ज्येष्ठ नेते श्रीधर देशपांडे यांचे निधन

Next

वयाने ज्येष्ठ असूनही तरुणांपेक्षा अधिक चपळतेने काम करणाऱ्या कॉ. देशपांडे यांनी कॉ. नाना मालुसरे यांच्या प्रेरणेने माकपचे काम सुरू केले आणि अखेरपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केले. मूळचे सोलापूर तालुक्यातील सांगोला येथील रहिवासी असलेले देशपांडे हे वडिलांच्या नोकरीमुळे नाशकात आले आणि नाशिककर झाले. पेठे हायस्कूलचे टॉपर असलेल्या श्रीधर देशपांडे हे १९६०मध्ये एलआयसीत नोकरीस लागले. त्यावेळी विमा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम सुरू केले. १९७२मध्ये ते कॉ. नाना मालुसरे यांच्या संपर्कात आले आणि पक्षाचे काम करू लागले. विमा कर्मचाऱ्यांची संघटनाही त्यांनी बांधली. १९९७-९८ मध्ये त्यांनी वर्ग एकमधील पदोन्नती नाकारून संघटनेच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनबरोबरच कायम राहण्याची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतरही मिळालेल्या रकमेतून पन्नास हजार रुपये पक्षाला देणगी दिली. त्यानंतर पक्षाचे पूर्णवेळ काम करू लागले. नेत्यांच्या सभा मेळाव्यांच्या नियोजनापासून प्रसिद्धीपत्रके, निवेदने लिहिण्याची कामे त्यांनी सातत्याने केली. नाशिकमधील पुरोगामी डाव्या आघाडीचे निमंत्रक म्हणूनदेखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. माकपचे शहर सचिवपद अनेक वर्षे सांभाळल्यानंतर आता ते सीटूचे जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ. डी. एल. कराड यांच्याबरोबर काम करू लागले होते. २००४ मध्ये नाशिकमधील सहकारी बँका आणि त्यामुळे ठेवीदार अडचणीत आल्यानंतर बँक बचाव समितीच्या माध्यमातून त्यांनी ठेवीदारांना त्यांचे अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी दिल्लीपर्यंत धडक दिली. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचचे अध्यक्षपद भूषवितांना आंदोलनातदेखील ते सहभागी होत. सर्वपक्षियांशी निकोप संबंध आणि वयाचे ज्येष्ठत्व असूनही सर्वच क्षेत्रांत मैत्रीचे संबंध जोपासलेल्या कॉ. देशपांडे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फेा..

लोकमतमध्ये विपुल लेखन

मार्क्सवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्य घटना हा त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. लोकमतमध्ये या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले. लोकमतच्या संपादकीय सल्लागार समितीचे ते सदस्यपदही भूषवित होते.

===Photopath===

030421\03nsk_25_03042021_13.jpg

===Caption===

कॉ. श्रीधर देशपांडे

Web Title: Senior CPI (M) leader Shridhar Deshpande passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.