वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची शाकाहारी ढाब्यावर ‘दबंगगिरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:55 AM2019-04-29T00:55:19+5:302019-04-29T00:55:36+5:30
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला.
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला. या ढाब्यावर तत्काळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोहचल्याने रात्रीचे भोजन आटोपणाºया ग्राहकांनी त्यांच्याकडे गाºहाणे मांडत पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत ‘दबंगिरी’ करत असल्याचा आरोप ‘त्या’ अधिकाºयासमोरच केला. यावेळी नांगरे-पाटील यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त वसावे यांना चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.
निवडणुकीची मतदान प्रक्रिया सोमवारी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून नांगरे-पाटील यांनी मद्यविक्रीवर अंकुश लावण्यासाठी आयुक्तालय हद्दीतील सर्व हॉटेल्स, देशी दारू व्रिकीची दुकाने, परमिटरूम, बार, विदेशी दारू दुकाने रात्री १० वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी (दि.२७) आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशन रात्री राबविले जात होते. यावेळी इंदिरानगर पोलीस ठाणेप्रमुखांचे पथक परिसरात गस्तीवर असताना, त्यांना येथील एक शाकाहारी ढाबा सुरू असल्याचे लक्षात आले. पोलीस अधिकाºयाने ढाबाचालकास ढाबा तासाभरात बंद करण्याच्या सूचना दिल्या व पथक पुढे रवाना झाले; मात्र तासाभरानंतरही ढाबा सुरूच होता. पोलीस अधिकाºयाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांना बळजबरीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. ग्राहकांमध्ये काही वकील व त्यांचे कुटुंबीयही होते. त्यांनी संबंधित अधिकाºयाची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला; मात्र ‘दबंग’ अधिकारी कोणालाही जुमानत नव्हता. अधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे ग्राहकांना लक्षात येताच त्यांनी त्या दबंग अधिकाºयाच्या वाहनाला घेराव घालत रोखून धरले. दरम्यान, दबंग अधिकाºयाने नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्रावरून माहिती देत ‘लोकेशन’ सांगून मदत मागितली. नियंत्रण कक्षाने त्यांचा संदेश पुढे पाठविला, यावेळी नांगरे-पाटील यांनीही संदेश ऐकला व त्यावेळी योगायोगाने ते इंदिरानगर पोलीस ठाण्यातच असल्याने तत्काळ त्यांनी घटनास्थळ गाठले.
खुर्च्यांची उलथापालट; ग्राहकांना धक्काबुक्की
‘त्या’ पोलीस अधिकाºयाने सोडलेल्या फर्मानानंतर वाहनातील पोलीस कर्मचाºयांनी ढाब्यामध्ये प्रवेश करून खुर्च्यांची उलथापालट करत ग्राहकांना धक्काबुक्कीदेखील केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वरिष्ठ अधिकाºयाने आपली दहशत पसरविण्याच्या हेतूने ‘दबंगगिरी’ केल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी नांगरे-पाटील यांच्याकडे केली आहे.