ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ रारावीकर यांचे दिल्लीत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:14 AM2019-01-02T01:14:25+5:302019-01-02T01:15:26+5:30
नाशिक : येथील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंत रारावीकर यांचे मंगळवारी (दि.१) नवी दिल्ली येथील निवासस्थानी पहाटे चार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. आशुतोष रारावीकर यांच्यासह सून व नातू असा परिवार आहे. डॉ. आशुतोष रारावीकर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी अॅण्ड रिसर्च विभागाचे संचालक आहेत.

पुणे विद्यापीठातून १९६१ मध्ये अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर डॉ. यशवंत रारावीकर यांनी ४१ वर्षे विविध महाविद्यालयांतून अध्यापनाचे काम केले. यातील ३३ वर्ष त्यांनी पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून काम केले. यात १९६४ ते १९६७ दरम्यान तीन वर्षांच्या कालावधीत अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव येथे कला व वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर १९६७ ते १९९६ या तीस वर्षांच्या कालावधीत नाशिकरोड येथील बिटको-चांडक महाविद्यालयात विभाग प्रमुख म्हणून काम करताना पूर्णवेळ अध्यापनाचे काम केले. यातील २५ वर्ष त्यांनी कला व वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे अध्यापन केले. अशाप्रकारे एकूण ३३ वर्ष पूर्णवेळ अध्यापनाचे कार्य करताना दरम्यानच्या काळात त्यांनी १९८० मध्ये पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ इकोनॉमिक्समधून पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालयात व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून क ाम करतानाच हजारो व्याख्याने दिली. कर्तव्यनिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करताना डॉ. रारावीकर यांनी पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अभ्यास मंडळाचेही कामकाज पाहिले. नाशिकमधून प्रकाशित होणाऱ्या ‘थिंक लाइन’ या अर्थविषयक द्वैमासिकाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.