ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. रामभाऊ धुमाळ यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 10:29 PM2020-09-07T22:29:45+5:302020-09-08T01:28:28+5:30
नाशिक : येथील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित रामभाऊ रंगनाथ धुमाळ (७७, गंगापूर रोड) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
नाशिक : येथील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित रामभाऊ रंगनाथ धुमाळ (७७, गंगापूर रोड) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
आकाशवाणीचे कलाकार असलेल्या पंडित रामभाऊ धुमाळ यांनी तबलावादक उस्ताद युसूफअली खान यांच्यासमवेत हार्मोनियमची साथ केली आहे. तसेच उत्तरा केळकर, श्रीकांत पारगावकर, शामा चित्तार, रंजना जोगळेकर, रवींद्र बिजूर आदी अनेक जुन्या-नव्या कलाकारांबरोबर साथसंगत केली आहे.
‘नेसली गं बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची...’ ही सुमारे ६० वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेल्या गौळणीला पंडित रामभाऊ धुमाळ यांनीच संगीतबद्द केले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संगीतकार धनंजय धुमाळ तबला वादक गोरखनाथ व अनिल धुमाळ यांचे ते वडील होत.