मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 08:09 AM2021-04-03T08:09:02+5:302021-04-03T08:09:13+5:30

त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगा हेमंत सून अश्विनी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. कॉ देशपांडे यांच्यावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

The senior leader of the Marxist Communist Party, Co. Shridhar Deshpande passed away | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ. श्रीधर देशपांडे यांचे निधन

Next

नाशिक- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज सकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते.गेल्या एक आठवड्यापासून ते आजारी होते .सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल व नंतर डॉ कराड यांच्या सातपूर येथील हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यंतरीच्या काळात प्रकृती सुधारत असतानाच काल सायंकाळी त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा, मुलगा हेमंत सून अश्विनी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. कॉ देशपांडे यांच्यावर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. वयाने जेष्ठ असूनही अखेर पर्यंत पक्षात सक्रिय राबून ते कार्य करीत होते. श्रीधर देशपांडे यांनी विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले. माकपचे शहर सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम बघितले. आता पक्षाच्या शहर सचिव मंडळात सदस्य तसेच जिल्हा सीटूचे अध्यक्ष होते.

त्याबरोबर डावे पुरोगामी संघटना यांच्याबरोबर त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्वदायी भूमिका बजावली.जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या धड्याचे त्यांनी नेतृत्व केले व न्याय मिळवून दिला. नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध पक्ष व संघटनेतील नेत्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होते .शेतकरी कामगार यांच्या चळवळी बरोबरच वर्तमानपत्रांमधून ते सातत्याने लिखाण करत असत .देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची फार मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: The senior leader of the Marxist Communist Party, Co. Shridhar Deshpande passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.