ज्येष्ठ शिक्षक वि.भा. देशपांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:32+5:302021-05-01T04:13:32+5:30
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ शिक्षक वि.भा. देशपांडे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पश: ...
नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य तथा ज्येष्ठ शिक्षक वि.भा. देशपांडे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी (दि.३०) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले वि.भा. शिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. विज्ञान आणि गणिताचे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी सलग नऊ वर्ष नाएसोच्याच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यपद भूषविले असून संस्थेच्या डी.एस. कोठारी कन्या शाळेचे शाळा समिती अध्यक्षाची धुराही त्यांनी समर्थपणे पेलली. वि.भा. देशपांडे यांच्या पत्नी अपर्णा देशपांडे (७०) यांचे याच महिन्यात दि.१० एप्रिल रोजी निधन झाले असून मोठा आनंद देशपांडे यांचे गुरुवारी (दि.२९) रात्री अडीच वाजता निधन झाले होते. त्याच्या पाठोपाठ वि.भा. देशपांडे यांनीही जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अमोल व अमित दोन मुले आहेत. यातील अमित देशपांडे रवींद्र विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असून ते विभा यांचा ज्ञानदानाचा वसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
===Photopath===
300421\30nsk_9_30042021_13.jpg
===Caption===
वि. भा. देशपांडे