ज्येष्ठांचा रंगला बुद्धिबळाचा डाव सप्ताह : भाऊसाहेब पडसलगीकर स्मरणार्थ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:46 PM2017-09-03T23:46:53+5:302017-09-04T00:05:51+5:30
जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.
नाशिक : जागतिक व राष्ट्रीय पातळीवर बुद्धिबळ दिवस २० जुलै रोजी, तर महाराष्ट्र पातळीवर भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या स्मरणार्थ ७ सप्टेंबर रोजी बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने १ ते ७ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे बुद्धिबळ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा सकाळी १० वाजता रेषा चेस अकॅडमी एस.बी.आय. बँकेच्या जवळ, एस.टी. कॉलनी, गंगापूररोड येथे नि:शुल्क आयोजित केलेली आहे. तसेच ११ वाजता नवीन प्रकारची ‘थीम स्पर्धा’ आयोजित केलेली आहे व या स्पर्धेनंतर लगेच दीड तासाचे विशेष प्रशिक्षण व नामवंत खेळाडू गणेश ताजने याचे सत्र आयोजित केले आहे. हे सत्र मोफत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुधीर पगार यांनी केले आहे. उद्घाटन समारंभाप्रसंगी नाशिकमधील ज्येष्ठ खेळाडू ८३ वर्षांचे मोकाशी, डी. एम. कुलकर्णी, पारखी संघटनेचे सहसचिव फडणीस यांच्या हस्ते संपन्न झाले. चित्रकला स्पर्धेसाठी नावनोंदणी रेषा असोसिएट्स येथे चालू आहे. अधिक माहितीसाठी अर्चना कुलकर्णी यांच्याशी संपर्कसाधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.