साकोऱ्यात कोरोनाबाधित रु ग्ण आढळल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:56 PM2020-06-25T22:56:58+5:302020-06-25T22:57:48+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात बुधवारी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावात बुधवारी कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या महिन्यात साकोरा येथील ५० वर्षीय व्यक्तीला घरीच हृदयाचा तीव्र झटका आल्याने नांदगाव येथील खासगी रुग्णालयात तीन दिवस उपचार घेऊन नाशिकला हलविण्यात आले होते. तेथे त्याची शस्रक्रिया करून घरी सोडण्यात आले होते, मात्र १६ जून रोजी त्याची पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यास नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्याची कोरोना टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले.
हे वृत्त गावात समजताच ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाकडून गावातील अत्यावश्यक सेवावगळता सर्व व्यवसाय आठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच संबंधित रुग्ण जेथे राहत होता तो परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याच्या सहवासातील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, सर्वांना साकोरा - सारताळे येथील आश्रमशाळेत क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.दिंडोरी तालुक्यात
नवीन रु ग्णदंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील ७५ वर्षीय वृद्धास कोरोना संसर्ग झाला आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून दररोज नवे रु ग्ण आढळत आहेत. मोहाडी येथे परवा एक रु ग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कातील अतिजोखमीच्या १३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असताना पुन्हा नवीन रु ग्ण आढळला. मोहाडीमध्ये आतापर्यंत चार रु ग्ण झाले आहेत, तर मातेरेवाडी येथील दोन संशयित व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.