बेवारस बॅगमुळे काहीकाळ खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:19 AM2017-08-09T00:19:21+5:302017-08-09T00:19:28+5:30

मंगळवारी सायंकाळी मेहेरे सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़

Sensation due to unavoidable bag | बेवारस बॅगमुळे काहीकाळ खळबळ

बेवारस बॅगमुळे काहीकाळ खळबळ

googlenewsNext

नाशिक : मंगळवारी सायंकाळी मेहेरे सिग्नलवर आढळून आलेल्या बेवारस बॅगमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती़ या माहितीनंतर बॉम्बशोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे आढळून आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़ दरम्यान, या घटनेमुळे परिसरात गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती़
मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मेहेर सिग्नलवर बेवारस बॅग आढळून आली़ नागरिकांनी ही माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, बॉम्बशोधक व नाशकचे पोलीस निरीक्षक ए. डी. पाटील हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी श्वान तसेच यंत्राद्वारे बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये आक्षेपार्ह काही नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी बॅग उघडून बघितली़ पोलिसांना या बॅगमध्ये दी न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीचे एजंट राजेश काळकर यांचे ओळखपत्र, कपडे व इन्श्युरन्सची कागदपत्रे आढळून आली़ दरम्यान, बॉम्बच्या अफवेने परिसरातील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागली़

Web Title: Sensation due to unavoidable bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.