नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 06:00 PM2021-08-18T18:00:38+5:302021-08-18T18:02:25+5:30

पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते.

Sensation over the suspicious death of MD young doctor in Nashik; Report of ragging against two female doctors | नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार

नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार

Next
ठळक मुद्देस्वप्नील रॅगींगचा बळी?दीड वर्षापासून शिंदे आडगाव मेडिकल कॉलेजमध्येशिंदे यांचा 'व्हीसेरा' अहवाल राखून ठेवण्यात आला आहेमुलाचा घातपात झाल्याची मयत स्वप्नील यांच्या वडिलांनी तक्रार

नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकिय शाखेतून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मुळ बीड जिल्ह्यातील डॉ. स्वप्नील महारुद्र शिंदे (२६) यांचा कॉलेजमध्ये झालेल्या मृत्युने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यु संशयास्पद असून त्यांच्यासोबत शिकणाऱ्या दोन महिला डॉक्टरांनी घातपात केल्याचा संशय शिंदे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयित दोन महिला डॉक्टरांसह महाविद्यालयाच्या अधिष्ठाताविरुध्द तक्रार दिली आहे. 
पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते त्यांना तत्काळ उपचारासाठी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. गेल्या एक दीड वर्षापासून शिंदे आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये एम.डी पदव्युत्तर पदवी पुर्ण करण्यासाठी बीड येथून दाखल झाले होते. त्यांच्या अचानकपणे झालेल्या मृत्युने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. दरम्यान, शिंदे यांचा 'व्हीसेरा' अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण बुधवारपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते. याप्रकरणी आडगव पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.१७) अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे. आपल्या मुलाचा घातपात झाला असल्याची तक्रार मयत स्वप्नील यांच्या वडिलांनी अर्जाद्वारे आडगाव पोलिसांकडे केली आहे.


स्वप्नील रॅगींगचा बळी?
स्वप्नील यांची त्यांच्या वैद्यकिय महाविद्यालयातील दोन महिला डॉक्टरांकडून रॅगिंग केले जात असल्याची महाविद्यालयाच्या कॅम्पस वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, स्वप्नील यांचे वडिलांनी दिलेल्या तक्रार अर्जात मात्र दोन महिला डॉक्टरांच्या नावांचा उल्लेख केलेला असून या दोघींपासून माझ्या जिविताला धोका असल्याचे स्वप्नील नेहमी सांगत होता, असेही म्हटले आहे. या दोन्ही डॉक्टरांसोबत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता आणि दुसऱ्या एका महिला डॉक्टराने मिळून संगनमत करुन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
-
मयत स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. स्वप्नीलवर ताण-तणावाविरुध्द संघर्ष करत होता त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी यापुर्वी कधीही रॅगिंगबाबतची कोणतीही तक्रार केलेली नाही. फेब्रुवारीपासून तो पाच महिने बीड येथील त्याच्या घरीच राहत होता. जुलैपासून स्वप्नीलसोबत त्याच्या आईदेखील कॅम्पसमधील वसतीगृहात राहत होत्या. मंगळवारी सकाळी तो चेंजींग रुमच्या टॉयलेटमध्ये पडला होता. वॉर्डबॉय यांच्या मदतीने त्याला बाहेर काढत तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले; मात्र रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.
- डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता, डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेज

Web Title: Sensation over the suspicious death of MD young doctor in Nashik; Report of ragging against two female doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.