मानवसेवेसाठी संवेदना जागृत होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:38 AM2019-04-01T01:38:41+5:302019-04-01T01:38:56+5:30

समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही.

 Sense of human services should be awakened | मानवसेवेसाठी संवेदना जागृत होणे गरजेचे

मानवसेवेसाठी संवेदना जागृत होणे गरजेचे

Next

नाशिक : समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही. अथवा उभे राहिले तरी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात माघार घेतात. त्यामुळे पीडित आणि वंचित घटकांतील मानवसेवेसाठी समाजातील संवेदना जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हजारो मनोरुग्णांचे पुनर्वसन करणारे डॉ. भरत वाटवानी यांनी केले.
महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये फ्युचर आॅफ सोशल वर्कतर्फे रविवारी (दि. ३१) कालिदास कलामंदिरमध्ये ‘एक संवाद-एक उकल’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. भरत वाटवाणी यांच्यासह युद्धभूमीवरील रुग्णांना सेवा देणारे डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणारे प्रमोद गायकवाड यांच्याशी प्रा. वृंदा भार्गवे व पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधत त्यांच्या सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला.
आत्मिक समाधान महत्त्वाचे
समाजसेवेत आत्मिक समाधान महत्त्वाचे असते. सिरियात युद्धजन्य परिस्थितीत रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केल्याचे समाधान सर्वांत मोठे असल्याचे डॉ. भरत केळकर यांनी सांगितले. त्यासोबतच यमन मोसूल मध्येही युद्धभूमीवरील रुग्णांची सेवा करण्याचा अनुभव आपल्याला आत्मिक समाधान मिळवून देणारा असल्याचे ते म्हणाले, तर सोशल मीडियाचा चांगला वापर झाला तर निश्चितच चांगले कार्य उभे करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त करताना प्रमोद गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी या क्षेत्रांत मूलभूत काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Sense of human services should be awakened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.