नाशिक मध्ये स्वाईन फ्ल्यूच्या साथीने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:12 PM2019-07-12T19:12:04+5:302019-07-12T19:17:52+5:30
नाशिक- शहरात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातले असून सात महिन्यात शहरात १० तर जिल्ह्यात एकुण ३५ जणांचा मृत्यू झाल्याने शासकिय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शासनाच्या साथ रोग नियंत्रण अधिकाऱ्यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली तर दुसरीकडे महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य यंत्रणेची बैठक घेऊन झाडाझडती घेतली.

शहरात गेल्या वर्षी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव नव्हता. मात्र यंदा जानेवारी महिन्यापासूनच रूग्ण आढळण्यास सुरूवात झाली. जुलै पर्यंत दीडशे जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून शहरातच दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर साथ रोग नियंत्रण विभागाच्या सहायक संचालक दर्जाच्या अधिकाºयांनी प्रशिक्षण दिले. तर दुसरीकडे महापौर रंजना भानसी यांनी आरोग्य व वैद्यकिय विभागाची झाडाझडती घेतली. महापालिकेचे अधिकारी प्रभागात फिरत नाही, आरोग्य तपासणी करीत नाही, घरभेटीचे प्रमाण हे दिसते त्यापेक्षा कमी असावेत अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच प्रशासनावर विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील यांनी टीका केली.
महापौरांनी साथ रोग नियंत्रणसाठी कृती आराखडा तयार करण्यास लावला असून त्यानुसार कृती होते किंवा नाही याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीस उपमहापौर प्रथमेश गिते, रिपाई गटनेत्या दीक्षा लोंढे तसेच आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड, उपआयुक्त घन कचरा व्यवस्थापन डॉ. सुनील बुकाणे यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.