पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 04:35 AM2017-08-07T04:35:35+5:302017-08-07T04:35:35+5:30

सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे.

Sensor recognizing risks of flood | पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

Next

संदीप भालेराव
नाशिक : सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य होऊन दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.
राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यांना पुराचा धोका असतो. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर गर्डरला सेन्सर लावले जाते. सेन्सरला पाणी लागल्यानंतर तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी वाढल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्ट
मिळाला होता.
त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत.

नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत.
यंदा नांदूरमधमेश्वर येथील पुलाला पाणी लागण्याच्या अगोदर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता.

सावित्री नदीवरील पुलालाही सेन्सर प्रणाली
महाड येथील सावित्री नदीवरील पुलाला पुराच्या पातळीची माहिती देणारे सेन्सर बसविण्यात आले आहे. मागील वर्षी २ आॅगस्टला पूल वाहून गेल्यानंतर १२ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत नवा पूल बांधण्यात आला.

Web Title: Sensor recognizing risks of flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.