जिल्ह्यातील १२ पुलांना अलर्ट देणारे सेन्सर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:48 AM2019-07-02T00:48:54+5:302019-07-02T00:49:19+5:30

पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत.

 Sensors giving alert to 12 bridges in the district | जिल्ह्यातील १२ पुलांना अलर्ट देणारे सेन्सर्स

जिल्ह्यातील १२ पुलांना अलर्ट देणारे सेन्सर्स

googlenewsNext

नाशिक : पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत. पुलाला धोकादायक पातळीपर्यंत पाणी लागल्यास सेन्सर्सद्वारे त्याची माहिती वेळीच संबंधित कक्षेतील अभियंत्याला भ्रमणध्वनीवर कळणार असून, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला पूर आल्यामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा नदीवरील पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येऊन पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील पूर्ण झाले असून, पुराचा धोका ओळखणारे सेन्सर्स पुलांना बसविण्यात आले आहेत. मागील वर्षीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची खबरदारी घेतली होती.
जिल्ह्यातील १०० ते २०० आणि २०० मीटरवरील ब्रिटिशकालीन पुलांना अशा प्रकारचे सेन्सर्स लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक तसेच साउथ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलांना सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत.
मालेगाव उपविभागातील गिरणा नदीवरील मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन्ही पूल तसेच काथरे दिगर-सटाणा-मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील पूल, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील काचनगाव- काळुस्ते तसेच नाशिक रिंगरोड (मोडाडी फाटा, सय्यद पिंप्री, लाखलगाव) येथील पूल, व नानेगाव पळस, पार नदीवरील करंजूल उंबरपेठ पळसन बाºहे, अंबेपेठ रोड, नार नदीवरील पळसन आमधा, पूनद नदीवरील मोकभनगी, कळवण, ओतूर, मुळाणे, बारी रोड, कडवा नदीवरील नाशिक-दिंडोरी-वणी रोड, सुखी नदीवरील मालेगाव-नांदगाव-शिऊर-औरंगाबादरोड या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहेत. मालेगाव सबडिव्हीजनमधील मोसम नदीवरील सटाणा-अजमिर-सौंदाणे-रावळगावरोड, त्याचप्रमाणे रावळगाव-वडनेर-गरेगाव-पोहणे-झोडगे, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील डुबेर-सोनांबे-शिवदे-पांढुर्ली-भगूररोड, त्र्यंबक सबडिव्हिजनमधील आडगाव वाघेरे-गिरणारे-हरसूल-ओझरखेड या ब्रिटिशकालीन पुलांना सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.
धोकादायक स्थितीत पूल बंद करणार
पुलाची परिस्थिती पाहून पुलाच्या किती अंतरावर सेन्सर्स बसवावे याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच अलर्ट मिळू शकेल, अशा अंतरावर सेन्सर्स बसविले जातात. जेणेकरून पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच सदर पुलावरून होणारी वाहतूक तातडीने बंद केली जाणार आहे. सेन्सर्सचे संदेश हे संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या भ्रमणध्वनीशी जोडण्यात आले आहेत.

Web Title:  Sensors giving alert to 12 bridges in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.