सटाणा न्यायालयाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासात सुनावली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:07 PM2018-09-26T18:07:29+5:302018-09-26T18:14:45+5:30

सटाणा : एकीकडे वर्षानुवर्षे न्यायालयात विविध खटले प्रलंबित राहत असतानाच ताहाराबाद-सटाणा रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत सटाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तात्काळ खटला चालवून ट्रकचालकाला शिक्षा सुनावत नुकसानग्रस्त कार चालकाला ५ हजार रु पये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Sentenced to 24 hours after the incident of crime in the Satana court | सटाणा न्यायालयाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासात सुनावली शिक्षा

सटाणा न्यायालयाने गुन्हा घडल्यानंतर २४ तासात सुनावली शिक्षा

Next
ठळक मुद्दे ट्रकचालकाचा परवाना रद्द करण्यासाठी सबंधित विभागाला कळविण्यात यावे असे आदेश

सटाणा : एकीकडे वर्षानुवर्षे न्यायालयात विविध खटले प्रलंबित राहत असतानाच ताहाराबाद-सटाणा रस्त्यावर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकावर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आत सटाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने तात्काळ खटला चालवून ट्रकचालकाला शिक्षा सुनावत नुकसानग्रस्त कार चालकाला ५ हजार रु पये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
घटना घडल्याच्या २४ तासांच्या आत गुन्हा दाखल होवून न्यायालयाने आरोपीला शिक्षेसह ५ हजार रु पये नुकसानभरपाई देण्याचा महत्वपूर्ण आदेश दिल्याची दुर्मिळ घटना सटाणा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या तत्परतेमुळे घडली आहे.
येथील किरण जयराम मराठे हे सोमवारी (दि.२४) आपल्या फोर्ड फिगो (एम. एच. ३९ जे १२६९) या कारने ताहाराबादमार्गे सप्तशृंगी गडावर जात असतांना आव्हाटी फाट्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला धडक दिली. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असतांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. कारमालक किरण मराठे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक महालिंगम एस शक्तीवेलुरम (तामिळनाडू) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दुसºयाच दिवशी सटाणा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याने याबाबत न्यायालयात सुनावणी होवून ट्रकचालक आरोपीला कोर्ट उठेपर्यंत कलम २७९ व १८४ अन्वये शिक्षा ठोठावली तसेच नुकसानग्रस्त कारचालकास पाच हजारांची नुकसानभरपाई देण्यासोबतच ट्रकचालकाचा परवाना रद्द करण्यासाठी सबंधित विभागाला कळविण्यात यावे असे आदेश देखील न्यायालयाने सटाणा पोलिसांना दिले आहे.

Web Title: Sentenced to 24 hours after the incident of crime in the Satana court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.