पोलिसांसोबत अरेरावी करणाºया रिक्षाचालक कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:47 PM2017-09-27T20:47:57+5:302017-09-27T20:48:41+5:30
दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालक विनोद भावसार याने १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रिक्षा उभी केली होती़
नाशिक : शहर वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करणारा रिक्षाचालक विनोद देविदास भावसार (रा. म्हसरूळ) यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सरीता भोर यांनी बुधवारी (दि़२७) एक महिना साधा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ १ आॅगस्ट २००९ रोजी पंचवटीतील दिंडोरीनाका परिसरात ही घटना घडली होती़
दिंडोरी नाक्यावर रिक्षाचालक विनोद भावसार याने १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे रिक्षा उभी केली होती़ शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रविंद्र आढाव यांनी रिक्षा काढण्यास सांगितले असता भावसार याने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़
भोर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील जगदिश सोनवणे यांनी सबळ पुरावे सादर केले़ यानुसार न्यायालयाने भावसार यास साधा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली़ पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक ए.बी.पवार यांनी या गुह्याचा तपास केला.