तलवार बाळगत दहशत निर्माण करणाऱ्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 09:24 PM2018-08-07T21:24:52+5:302018-08-07T21:25:23+5:30

मालेगाव : नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही तीन वेगवेगळ्या ठिकाणी धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाºया अमीनखान तालीबखान यास एकूण पाच वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.

Sentenced to a terrorist who created terror | तलवार बाळगत दहशत निर्माण करणाऱ्यास शिक्षा

तलवार बाळगत दहशत निर्माण करणाऱ्यास शिक्षा

Next

८ जानेवारी २०१८ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमीनखान हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करताना आढळून आला होता. पोलीस नाईक श्याम पवार यांनी फिर्याद दिली होती. आरोपीस अटक करून हवालदार एस. के. माळी यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. ५ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास आयेशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामगार कॉलनी येथे धारदार तलवार बाळगताना आढळून आला होता. त्यास अटक करून हवालदार एस.एम. देवरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. १५ डिसेंबर २०१७ रोजी रात्री जिल्ह्यातून हद्दपार केलेले असतानाही अमीनखान मिळून आला होता. त्यास अटक करून हवालदार एस.एम. देवरे यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने फिर्यादी, साक्षीदार, पंच, तपास अधिकारी आदी साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी व साक्षीदारांचा प्रत्यक्ष पुरावा, जप्त मुद्देमाल व हद्दपार आदेश हा सरकार पक्षाचा बळकट पुरावा ग्राह्य धरण्यात आला. यात पहिल्या केसमध्ये अमीनखान यास तीन वर्षांची शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास. दुसºया केसमध्ये दोन वर्षे शिक्षा, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास व तिसºया केसमध्ये दोन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
तिन्ही गुन्ह्यांच्या चौकशीचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.पी. पेठकर यांनी पाहिले. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील गिरीश पवार यांनी काम पाहिले.

Web Title: Sentenced to a terrorist who created terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा