वडाळा आरोग्य केंद्रात येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:14 AM2021-03-31T04:14:39+5:302021-03-31T04:14:39+5:30
मंगळवारी पूर्व प्रभाग समितीची सभा घेण्यात आली. या सभेत मकरंद कॉलनीपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून अतिक्रमण अद्यापपर्यंत काढण्यात ...
मंगळवारी पूर्व प्रभाग समितीची सभा घेण्यात आली. या सभेत मकरंद कॉलनीपर्यंत रस्त्याचे काम सुरू असून अतिक्रमण अद्यापपर्यंत काढण्यात न आल्याने काम संथगतीने होत असल्याची तक्रार सुषमा पगारे यांनी केली, तसेच वडाळागावातील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना संसर्गाच्या तपासणीसाठी व लसीकरणासाठी एकच प्रवेशदार असल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता टाळता येत नाही, अशी तक्रार अजिंक्य साने यांनी केली. उपनगर येथील महापालिका रुग्णालयात लसीकरणाला येणाऱ्या नागरिकांना उन्हात उभे राहावे लागते त्यांच्यासाठी शेडची सोय करावी, अशी मागणी अनिल ताजनपुरे यांनी केली. विषयपत्रिकेवर दोनच विषय असल्याने अवघ्या एक तासात सभा संपली. याप्रसंगी सुमारे सात लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली, तसेच कोरोना संसर्ग काळात जिवाची पर्वा न करता काम करणारे महापालिकेचे डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान अनिल ताजनपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.