आहेरगावात लोकवर्गणीतून विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 10:47 PM2021-05-04T22:47:08+5:302021-05-05T00:50:45+5:30
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गाव प्रशासनाने पुढाकार घेतला असून, गाव सुदृढ राहण्याकरिता लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
पिंपळगाव बसवंत : कोरोनाचा छोट्या गावात देखील प्रादुर्भाव दिसू लागला आहे. परिणामी अनेकांना जीवास मुकावे लागत आहे, तर गावात संचारबंदी आणि उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, अशा परिस्थितीत गावातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गाव प्रशासनाने पुढाकार घेतला असून, गाव सुदृढ राहण्याकरिता लोकवर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.
आहेरगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गाव कारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यात सरपंचांच्या पुढाकाराने ग्राम रक्षक, कुटुंब रक्षक, समाज रक्षक आदी नेमून युवा पिढीला मार्गदर्शन प्रशासनामार्फत केले जात आहे. तसेच गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना व तरुणांना संपर्क करून गावात कोणीही कोरोनाबाधित होऊ नये, यासाठी मदत कार्य सुरू केले आहे. शिवाय, कोरोनामुक्त गाव या अभियानांतर्गत विलगीकरण कक्षाची उभारणी केली आहे.
ट्रॅक्टर, ब्लोअरच्या साह्याने गाव सॅनिटायझर केले जात आहे. शिवाय गावातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिल्हा परिषद शिक्षक, कर्मचारी यांना मार्गदर्शन करून त्यांना सर्वेक्षणासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतीच्या मार्फत पुरवले जात आहे. कोरोनाचे लक्षण आढळल्यास त्या रुग्णांना विलगीकरण कक्षात हलवले जात आहे
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ज्या नागरिकांना कोरोनासंदर्भात कोणतेही लक्षण आढळून आले तर त्यांनी गावात उभारण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. म्हणजे आपले संपूर्ण कुटुंब बाधित होणार नाही.
- संगीता शिंदे, सरपंच, आहेरगाव.
कक्षात विविध सुविधा
कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत आहेरगाव ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या बाहेर २०० मीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने बाधित रुग्णांना विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून, त्या ठिकाणी स्वतंत्र महिला व पुरुष कक्ष, त्यात २४ तास लाईट, डसबिन, टॉयलेट, जेवण आदी सुविधा केल्या आहेत. यासाठी आहेरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच रामकिसन शिंदे, काशीनाथ मोरे, कृष्णा रसाळ, रामराव रसाळ, बाळासाहेब गांगुर्डे, गणेश निकम, धनश्री गवळी, मनीषा मोरे, लक्ष्मीबाई जाधव, स्वाती बागुल, तलाठी कनोज, पोलीस पाटील भरत कोकाटे आदींसह ग्रामविकास अधिकारी भालचंद्र तरवारे व ग्रामपंचायत कर्मचारी परिश्रम घेत आहेत.