परदेशातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:32+5:302021-01-08T04:42:32+5:30
ओझर येथील विमानतळावर उतरणाऱ्या विमान प्रवाशांची आरेाग्य तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन म्हणून महापालिकेला याबाबतची ...
ओझर येथील विमानतळावर उतरणाऱ्या विमान प्रवाशांची आरेाग्य तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन म्हणून महापालिकेला याबाबतची माहितीदेखील दिली जात आहे. कोणत्याही प्रवाशाला लागण झाली नसल्याचे समेार आले असून यापूर्वी काही प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले हेाते. आता अशा प्रवासीदेखील आपल्या कुटुंबात परतले आहेत.
हवाई मार्गाने विदेशातून आलेल्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्यात आली असून ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह होती त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यांच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारून घरी १४ दिवस क्वारंटीन राहणे बंधनकारक होते. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात याबाबत समन्वय कक्ष स्थापन केला. तेथुन सर्व ऑपरेशन राबविण्यात आले. लाॅकडाऊन जारी झाल्यानंतर ते आतापर्यंत २३२ प्रवासी विदेशातून नाशिकमध्ये आल्याची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाने विदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना हाॅटेलमध्ये विलगीकरणात ठेवले असून ज्यांनी होम क्वारंटीन राहण्याची हमी दिली त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.