सामनगावच्या शाळेत विलगीकरण कक्ष कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:06+5:302021-04-24T04:14:06+5:30
ज्या व्यक्तीला आपल्या घरात विलगीकरण करण्यास अडचण आहे, जसे की स्वतंत्र खोली, शौचालय, न्हाणीघर आदी व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ...
ज्या व्यक्तीला आपल्या घरात विलगीकरण करण्यास अडचण आहे, जसे की स्वतंत्र खोली, शौचालय, न्हाणीघर आदी व्यवस्था उपलब्ध नाही, अशा व्यक्तीने विलगीकरण कक्षात दाखल व्हावे. विलगीकरण कक्षात दाखल होत असताना आपल्याला काही आजार असल्यास त्यावरील औषधे स्वतःजवळ बाळगावी व नियमितपणे त्यांचे सेवन चालू ठेवावे.
विलगीकरण कक्षात कोरोना अथवा इतर आजारांसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या गावातील आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला व सामाजिक बांधिलकीतून सेवा म्हणून भेट देतील. विलगीकरण कक्षात दाखल होण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. दाखल होणाऱ्या व्यक्तीने रोजच्या वापरासाठी लागणारे साहित्य कपडे, बेडशीट, उशी, पांघरूण, मास्क, टूथपेस्ट-ब्रश, अंगाची व कपड्याची साबण स्वत: घेऊन यावयाचे आहे.
सदर कोरोना विलगीकरण कक्षात फक्त सामनगावातील रुग्णांना प्रवेश असेल. याबाबत अधिक माहितीसाठी ग्रामसेवक बापू पवार, पंचायत समिती उपसभापती अनिल जगताप, सरपंच मीराबाई घायवटे, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल व दीपक जगताप, बबन मोंढे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी जगताप, योगेश दादा जगताप, लकी ढोकणे, भास्कर जगताप, तानाजी जगताप यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.