घोटेवाडीत लोकसहभागातून विलगीकरण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:59+5:302021-05-18T04:14:59+5:30

जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, सरपंच मंजुश्री भरत घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर आदींच्या हस्ते या कक्षाचा शुभारंभ करण्यात ...

Separation room from public participation in Ghotewadi | घोटेवाडीत लोकसहभागातून विलगीकरण कक्ष

घोटेवाडीत लोकसहभागातून विलगीकरण कक्ष

Next

जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, सरपंच मंजुश्री भरत घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर आदींच्या हस्ते या कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सदस्य गोरक्षनाथ घोटेकर, संतोष सरोदे, ग्रामसेवक संदीप वाकचौरे, पत्रकार भरत घोटेकर, शालेय समितीचे अध्यक्ष वसंत ढमाले, कृष्णाजी घोटेकर, बाबासाहेब घोटेकर, रवींद्र सरोदे, भारत घोटेकर, आशासेविका मनीषा यादव, कल्पना लोहोट, ग्रामपंचायत कर्मचारी विलास गुंजाळ, लक्ष्मण कडवे, श्रद्धा सूर्यवंशी, अमोल घेगडमल, इंद्रभान घोटेकर, रामा सरोदे आदी उपस्थित होते. उत्कृष्ट बेड व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, सकाळी नाश्त्यासाठी अंडी, मोफत कोरोना प्रतिबंधक औषधे, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, आशा सेविकांकरवी तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल माॅनिटरींग आदी सुविधा या विलगीकरण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

चौकट-

९७ नागरिकांची अँटिजन टेस्ट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दहा दिवसात ५ जणांचा कोरोनाने झालेला मृत्यू यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने गावातील सामाजिक सभागृहात अँटिजन टेस्ट कँप आयोजित करून ९७ नागरिकांची मोफत तपासणी केली. त्यात ११ जण बाधित निघाले. तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन बच्छाव, वावीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया राशिनकर यांच्या सहकार्यातून राबवलेल्या या कॅम्पमध्ये डॉ. अमोल बैरागी, आरोग्यसेविका एन. आर. बिडवई, आरोग्य सहायक बी. बी. पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेंद्र गोराणे, नवनाथ नवले आदींनी रुग्णांची तपासणी केली.

फोटो- १७ घोटेवाडी कोविड

सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथे विलगीकरण कक्षाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, समवेत सरपंच मंजुश्री घोटेकर, गोरक्षनाथ घोटेकर आदींसह मान्यवर.

===Photopath===

170521\17nsk_26_17052021_13.jpg

===Caption===

फोटो- १७ घोटेवाडी कोविड सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथे विलगीकरण कक्षाच्या शुभारंभप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सिमंतीनी कोकाटे, समवेत सरपंच मंजुश्री घोटेकर, गोरक्षनाथ घोटेकर आदींसह मान्यवर.

Web Title: Separation room from public participation in Ghotewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.